| | | | | Login | Check Mail
मराठी विभागाचे ध्येये आणि उद्दिष्टे आवश्यक मराठी आणि मराठी वाड्मय या विषयाची उद्दिष्टे आणि ध्येय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1. आवश्यक मराठी शिकवतांना केवळ पाठापुरतं शिकविल्या न जाता शुद्धलेखनाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले जावे. त्यासाठी त्यांचा सराव करून घेतला पाहिजे. मराठी वाड्मयाच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासामागची नेमकी भूमिका समजली पाहिजे. कारण या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना जी दृष्टी मिळेल त्यामुळे त्यांची वाड्मयाविषयीची आवड वाढेल. त्याला पूरक असाच अमरावती विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे.
2. मराठी भाषेविषयी प्रेम वाटेल, संवेदनशील वृत्ती विकसित होईल अशी क्षमता या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे. विविध वाड्मय प्रकार, संकल्पना, प्रवाह आणि प्रवृत्ती इ. ची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये पक्व व्हावी हा या विषयाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी स्वतः निर्णय घेऊ शकला पाहिजे. त्याला निष्कर्ष काढता आला पाहिजे. हाही एक उद्देश आहे. उदा. कादंबरी एखादी, एखादे नाटक, कथा इत्यादी.
हेतू
पदवीच्या विद्यार्थ्यांना मराठीचा विकास कसा होत गेला, भाषाशैली, काव्यशैलीची रूपे कशी बदलत गेली हे विद्यार्थ्यांना कळावे आणि एकूणच वाड्मयीन अभिरुची वृद्धिंगत व्हावी. चांगला वाचक व व्यवहारात चांगली भाषा योजू शकणारा माणूस निर्माण व्हावा हा हेतू समोर ठेवूनच अभ्यासक्रम पूर्ण केला जावा असे मला वाटते. विद्यार्थ्यांना नेमलेल्या वेच्यांचे सूक्ष्म अध्ययन करता यावे. हे अपेक्षित असते. यानिमित्ताने वाड्मय विषयक संकल्पना संक्षेपाने त्या त्या वाड्मय प्रवाहाची इतिहासाची धावती ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या अभ्यासा मागील हेतू आहे.
थोडक्यात
अ) मराठी भाषा आणि वाड्मयाचे प्रगत ज्ञान होणे.
ब) विद्यार्थ्यांच्या ठिकाणी चिकित्सक अभ्यासाची क्षमता वाढविणे.
क) वाड्मयीन प्रश्नासंबंधी विचार करण्याची जाणीव निर्माण होणे.
ड) वाड्मयाची व जीवनाची जाणीव प्रगल्भ होणे.
इ) संगणक विषय ज्ञान वाढीस लागणे.
फ) संशोधन संपादन क्षमता वाढविणे.
ग) एखाद्या लेखकाच्या समग्र साहित्याचा अभ्यास करून स्वतःचे निष्कर्ष काढता येणे इ.